बिग बॉस १७ पुन्हा रंगला वाद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० ऑक्टोबर २०२३

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांचा कलर्स टीव्हीवर टीव्हीचा सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय शो बिग बॉस 17 पुन्हा एकदा सुरू झाला आहे. हा शो पुन्हा चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात आता पुन्हा वाद विवाद रंगले आहे.

एकीकडे मुनव्वर आणि खानजादीमध्ये वाद झाला तर दुसरीकडे अंकिता आणि विकीमध्येही दुरावा आला आहे. आता त्यातच विकी जैनचे पुन्हा भांडण झाले आहे. मात्र यावेळी विकीने शांत स्वभावामुळे चर्चेत असलेल्या नीलसोबत पंगा घेतला आहे. नील हा घरात त्याच्या शांत स्वभावामुळे लाईमलाईटमध्ये राहत नाही. तो घरातील वादापासूनही बराच लांब राहतो. मात्र आता निर्मात्यांनी बिग बॉसच्या घरातील काही झलक सोशल मीडियावर शेयर केली आहे. बिग बॉसचा लेटेस्ट प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बिग बॉस 17 च्या आगामी एपिसोडमध्ये नील भट्ट चांगलाच संतापलेला दिसत आहे. त्याच्या रागाचे कारण ठरला आहे तो अंकिता लोखंडेचा पती विकी जैन . प्रोमोत नील विकीसोबत भांडताना दिसत आहे. शांत दिसणारा नील त्याचे संयम हरवतो आणि खुपच हायपर झालेला दिसतो. घरातील इतर सदस्य त्याला शांत करताना दिसतात. मात्र विकी पुन्हा त्याला असं काही बोलतो की नीलचा संयम सुटतो आणि अंकिताच्या नवऱ्याला मारण्यासाठी धावतो. मात्र आपल्या पतीचा संताप पाहिल्यानंतर ऐश्वर्यादेखील नीलला शांत करण्याचा प्रयत्न करते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम