आरक्षण घेतल्याशिवाय १ इंचही मागे हटणार नाही ; पाटील !
बातमीदार | २० ऑक्टोबर २०२३
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात जात आपला लढा तीव्र करीत आहे. तर शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये भव्य सभा देखील त्यांची झाली. या सभेत त्यांनी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. विशेषतः मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सुनील कावळे यांच्या मृ्त्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही केला. सरकारने आपलीच लोकं आपल्या अंगावर घालण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे सर्वांनी सावध रहावे. उद्यापासून सर्वांनी कामाला लागा. घरोघरी जावून आरक्षण का महत्त्वाचे आहे हे समजावून सांगावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सरकारने आपलीच लोकं आपल्या अंगावर घालण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे मराठ्यांनो उद्यापासून कामाला लागला. आरक्षण का महत्त्वाचे आहे हे घरोघरी जावून लोकांना समजावून सांगा, असे ते म्हणालेत. मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत पुढील 3-4 दिवसांत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजाला कामाला लागण्याचे आदेश दिल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची भीती निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण मी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागे हटणार नाही. मराठा समाजाने आरक्षणासाठी मोर्चे काढले. पण सरकारने आमची भावना समजून घेतली नाही. त्यामुळे आता आरक्षणाचा मुद्दा घरोघरी पोहोचला पाहिजे. काही लोक मराठा आणि कुणबी वेगळे म्हणून बुद्धीभेद करत आहेत. पण कुणबी व मराठा हे एकच आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम