राजस्थानात ‘बिपोरजॉय’ वादळाने ४ जणांचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  राजस्थानमधील तीन जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ ‘बिपोरजॉय मुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे जालोर सिरोही आणि बाडमेरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात विविध घटनांमध्ये दोन लहान मुलांसह ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुजरात सीमेजवळ नर्मदेचा एक कालवा फुटल्यामुळे अनेक भागांत पाणी शिरले आहे. सांचौर शहराला याचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.

बाडमेर जिल्ह्यात तलावात बुडून
दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला, तर राजसमंदजवळ दरड कोसळल्यामुळे तरुण मरण पावला. याच जिल्ह्यात एका महिलेचा घराचे छत कोसळल्यामुळे मृत्यू झाला. बाडमेर, अजमेर, सिरोही, बांसवाडा, उदयपूर, कोटा, जोधपूर यासह अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंडवाडा, अबू रोड आणि रेवारमधील अनेक मोठी धरणे पाण्याने भरली आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम