शासकीय पैश्यातून पुतळे उभारू नका ; मंत्री गडकरी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  देशातील केद्रीय नेते नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या कामांच्या माध्यमातून व भाषणातून चर्चेत येत असतात. त्यांनी नुकतेच आता ज्ञानाच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होत असल्याने नवीन पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल.हा पुतळा लोकसहभागातून तयार होणार असल्याची बाब कौतुकास्पद आहे.

सरकारी पैशांतून पुतळे उभारूच नयेत, असे माझे मत आहे. लोकांना फुकट मिळालेल्या गोष्टींचे महत्त्व नसते. आर्थिक योगदान दिले तरच लोकांना महत्त्व कळते, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची उभारणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग चौक परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे. या भूमिपूजनानंतर आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम