भाजपच्या आरोग्यमंत्र्यांनी केले उद्धव ठाकरेंच्या ‘या’ कारणाने कौतुक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जून २०२३ ।  भाजपकडून ठाकरेंवर टीकेची झोड उठवली जात असताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया कोरोना काळात राज्यात चांगले काम झाल्याचे सांगत कोरोना काळातील उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक केले आहे. यामुळे सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे, तर यावर सारवासारव करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मांडविया हे आयुष्यमान भारत योजनेबाबत बोलत होते.

दरम्यान त्यावेळी ठाकरे सरकार सत्तेत होते, हा प्रश्न उपस्थित करताच आरोग्यमंत्री मांडविया म्हणाले, कोरोना काळातील कामावर कुठल्याही प्रकारे मला राजकारण करायच नाही. कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या कामात गैरव्यवहाराबाबत ईडीने विविध ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीनंतर भाजपने ठाकरे गटावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजपकडून केले जात आहे.

मांडविया म्हणाले की, कोरोना काळात राज्यात चांगले काम झाल्याचे सांगत कोरोना काळातील कामाचे कौतुक केले आहे. जर यामध्ये कुठले चुकीचे काम झाले असेल तर या संदर्भात कारवाई व्हायला हवी, असे सुद्धा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी च्या पत्रकार परिषदेत सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी बोलताना मनसुख मांडवीया हे आयुष्यमान भारत योजनेत संदर्भात बोलत असल्याचे सांगत सारवासारव केली.

कोरोना काळात झालेल्या गैरप्रकारांची ईडीच्या वतीने चौकशी करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांच्या घरी ईडीचे अधिकारी कालपासून चौकशा करत आहेत. त्यातच ईडीचे अधिकारी भायखळ्यातील महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खाते विभाग कार्यालयात देखील गेले होते. कोरोना काळात स्थापन करण्यात आलेल्या जम्बो कोरोना सेंटरच्या कंत्राटातील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व उच्चपदस्थ सनदी आधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. या कारवाईत जयस्वाल यांच्या पत्नीची स्थावर व जंगम मालमत्ता मिळून तब्बल 50 कोटींची संपत्ती उजेडात आली आहे. यात मढ आयलंडवरील अर्धा एकर जमीन, अनेक फ्लॅट्स व बँकेतील 15 कोटींच्या मुदत ठेवीचा समावेश आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या सोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारीही सोबत असून कोविड घोटाळा प्रकरणाती ईडीचे धाडसत्र सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्याकडून पालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम