सनी देओलमुळे झाले धर्मेद्रचे दुसरे लग्न !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जून २०२३ ।  नेहमीच आपल्या दमदार चित्रपटामुळे चर्चेत राहणारा सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्यांच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले असून त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमाचे किस्से आज देखील चाहत्यांमध्ये रंगतात. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष पुर्ण झाली आहे. समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नानंतर आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. अशात नुकताच अभिनेते सनी देओल यांच्या मुलाचं लग्न झालं. पण देओल कुटुंबाच्या मुलाच्या लग्नात धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब उपस्थित नव्हतं… धर्मेंद्र यांनी जेव्हा दुसरं लग्न केलं तेव्हा सर्वत्र खळबळ माजली होती. शिवाय अनेक चर्चा देखील रंगल्या. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर झगमगत्या विश्वापासून दूर असतात. पण जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं होतं, तेव्हा प्रकाश कौर यांनी मोठे खुलासे करत खंत व्यक्त केली होती.

धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्यामध्ये एक करार झाला होता.. त्या करारानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न झाल्याची चर्चा रंगली होती.. हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करायचं असेल तर, सनी देओल याला बॉलिवूडमध्ये लॉन्च करावं लागेलं.. अशी चर्चा रंगली होती… रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देत प्रकाश कौर म्हणाल्या, ‘असं काहीही झालं नव्हतं. सनी देओल तर धर्मेंद्र यांचा देखील मुलगा आहे.. मुलाचं चांगलं व्हावं असंं प्रत्येक वडिलांना वाटतं…’ एवढंच नाही तर धर्मेंद्र यांना ट्रोल करणाऱ्यांना देखील प्रकाश कौर यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं..

धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रकाश कौर म्हणाल्या, ‘धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर त्यांना अनेकजण स्त्रीलंपट म्हणू लागले होते. कोणी माझ्या पतीला असं का म्हणू शकतं? जेव्हा इंडस्ट्रीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी असंच केलं आहे. प्रत्येक अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि ते दुसरं लग्न करत आहेत.’
‘धर्मेंद्र चांगले पती होवू शकले नाहीत. पण माझ्यासाठी ते प्रचंड चांगले होते.. ते एक उत्तम वडील आहेत…’ असं देखील प्रकाश कौर मुलाखतीत म्हणाल्या. शिवाय हेमा मालिनी यांच्या जागी मी असते, तर मी असं कधीच केलं नसतं… अशी खंत देखील धर्मेंद्र यांच्या पत्नी प्रकाश कौर यांनी व्यक्त केली. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी १९५४ साली १९ वर्षीय प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुलं आहे. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम