भाजप नेते सोमयांच्या ‘त्या’ व्हिडीओ नंतर पत्र व्हायरल !
दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ । राज्यातील भाजपचे दिग्गज नेते किरीट सोमय्या यांचा सोमवारी रात्री एका वृत्तवहिनीने व्हिडीओ व्हायरल करीत याबाबत कारवाई होणार का ? अशी विचारणा केली असता त्यावर आज सकाळी किरीट सोमय्या यांनी एक पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीत कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ एका मराठी वृत्त वाहिनीने समोर आणला आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ त्यांच्या हाती असल्याचा दावा हे चॅनल करत आहे, ज्यामध्ये किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणी आता किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
A video clip of me was shown on a news channel. Claimed that I have harrassed many women & many such video clips available & complaints received against Me
I have never abused any woman
Request @Dev_Fadnavis to investigate such allegations and verify the authenticity of Videos pic.twitter.com/rR0l4nalOz
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लिहिलेलं पत्र – “आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. ” “मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार…. झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी अशी मी आपणास विनंती करीत आहे, कळावे.”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम