हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ ऑक्टोबर २०२२ ।  देशात निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे नुकतीच हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी सकाळी 62 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 5 महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर सिराज मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

त्यांच्या विरोधात काँग्रेसचे चेतराम रिंगणात आहेत. अनिल शर्मा मंडी आणि सतपाल सिंग सत्ती उनामधून निवडणूक लढवणार आहेत. राज्यात एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ 8 जानेवारीला संपत आहे. हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. त्यापैकी 20 जागा राखीव आहेत. 17 जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) आणि 3 जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. 2017 मध्ये भाजपने पूर्ण बहुमताने विजय मिळवून सरकार स्थापन केले. निवडणुकीत भाजपला 44, तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या. सीपीआय(एम)ने एक जागा जिंकली आणि दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम