राणे विरुद्ध ठाकरे गटात रंगले वाकयुद्ध !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ ऑक्टोबर २०२२ । राज्याच्या राजकारणात सुरु असलेली गटबाजीचे पडसाद आता कोकणात उमटत असल्याचे चिन्ह जाणवायला लागले आहे. भास्कर जाधव आणि राणे कुटुंबात वैयक्तिक पातळीवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे गट संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

निलेश राणे यांची जहरी टीका
सत्ता गेल्याने मविआचे नेते बेरोजगार झाले आहेत, त्यांच्याकडे काही कामधंदे उरले नाहीत, दिवसभर भाजप काय काय करतं याकडे त्यांचं लक्ष असतं अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. तसंच भास्कर जाधव कार्टून आहे, तळ कोकणात आम्ही त्याला बैल म्हणतो, तो उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी बोलत असल्याची बोचरी टीकाही निलेश राणे यांनी केली.

भास्कर जाधव यांचं प्रत्युत्तर
शिवसेना आमदार वैभव नाईक यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीविरोधात शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा आयोजित केला होता. यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली, तसंच निलेश राणे यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. शिवसेनेने काही केलं नाही, असं नारायण राणे सारखं बोलत असतात, मग तू काय म्हशी भादरत होता का? असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.नारायण राणे म्हणजे कोंबडी चोर आणि त्यांचा मुलगा निलेश राणे म्हणजे चरसी अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यावर जहरी टीका केली. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की केरळचं उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले.पण राणेंनी देशात कोकणाची लाज काढल्याचं सांगत भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं. दरम्यान नितेश राणे यांनी भास्कर जाधवांच्या टीकेला उत्तर दिलंय. शिक्षकाचा मुलगा वात्रट निघेल असं वाटलं नव्हतं अशी टीका नितेश राणे यांनी केलीय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम