
भाजप खासदार मंगेशकर रूग्णालयात दाखल !
दै. बातमीदार । २९ मार्च २०२३ । राज्यातील भाजप खासदार बापट यांची गेल्या काही दिवसापासून ते आजारी आहेत. त्यांच्या तब्येतीत कुठलीही सुधारणा होत नसल्याचे प्राथमिक माहिती आहे. यादरम्यान बापटांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता.
अद्याप अधिकृत माहिती हाती आली नाही. पुण्यातील मंगेशकर रूग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम