जुन्या संसद भवनात फोटो सेशन दरम्यान भाजप खासदार बेशुद्ध !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ सप्टेंबर २०२३ | गेल्या ७५ वर्षांची संसदीय परंपरा जपलेल्या संसदेतून बाहेर पडण्यापूर्वी तिथे फोटो सेशन पार पडलं. या फोटो सेशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदारही उपस्थित होते. खासदारांच्या ग्रुप फोटो सेशनदरम्यान भाजप खासदार नरहरी अमीन हे अचानक बेशुद्ध पडले.

गोंधळानंतर फोटो सेशन मधेच थांबवून सगळे त्यांच्या दिशेने धावले. पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी देखील फोटो सेशनमध्ये भाग घेतला. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत महिती दिली आहे. नरहरी अमीन हे गुजरातमधील भाजपचे खासदार आहेत. फोटो सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी ते संसद भवनात उपस्थित होते, मात्र अचानक ते बेशुद्ध झाले. नंतर काही वेळातच त्यांना बरं वाटलं.

फोटो सेशननंतर दोन्ही सभागृहातील खासदार सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. त्यानंतर सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संसदेच्या नवीन इमारतीत दाखल होतील. गणेश चतुर्थीच्या विशेष मुहूर्तावर आज, १९ सप्टेंबरपासून नवीन संसद भवनात कामकाज सुरू होणार आहे. काल जुन्या संसदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी खूपच भावूक झाले होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम