भाजप खासदाराच्या चारचाकी फोडल्या ; आंदोलकाशी बाचाबाची !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ ऑक्टोबर २०२३

नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात राजकीय नेत्याना गावबंदी असतांना देखील गावात आलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची रात्री तोडफोड करण्यात आली आहे. हि घटना रात्री उशिरा समोर आली. या वेळी मराठा आंदोलक आणि खासदारांच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची देखील झाली.

संतप्त मराठा आंदोलकांनी खासदारांसह त्यांच्यासोबत असलेल्या वाहनांची यावेळी तोडफोड करण्यात आली आहे. सुदैवाने यात कोणालाही कोणत्याच प्रकारची इजा झालेली नाही. खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तोडफोडीत तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान खासदार चिखलीकर यांचे कर्मचारी आणि मराठा आंदोलक यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात शुक्रवारी रात्री खासदार प्रताप पाटील चिखलीकर गेले होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांना भेटण्यासाठी ते या गावात गेले होते. मनोहर तेलंग यांची भेट घेतल्यानंतर ते बाहेर पडत असताना तेलंग यांच्या घरासमोर मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्या आधीच ग्रामस्थांकडून गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे गावात प्रवेश केल्यानंतर मराठा बांधवानी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत खासदार चिखलीकर यांचा विरोध केला. त्यांना परत जाण्याची विनंती करण्यात आली. याच दरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यातील दोन वाहनावर दगडफेक केली. दगडफेकीमुळे दोन वाहनांच्या काचा फुटल्या. दरम्यान या घटनेनंतर गावात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम