आरक्षण हेच माझ्यावर एकमेव उपचार ; मनोज जरांगे पाटील !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ ऑक्टोबर २०२३

राज्यभरात आता मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक होत आहे तर राजकीय नेत्यांना सुद्धा गावबंदी केल्याच्या घटना घडल्या आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षण हेच माझ्यावरील उपचार आहेत, असे सांगत वैद्यकीय पथकाला परत पाठविले. आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शासन, प्रशासन पातळीवरून कोणी संवाद साधला नसल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शासनाला दिलेला ४० दिवसांचा कालावधी संपला. यामुळे जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यात ठिकठिकाणीही साखळी उपोषण केले जात आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतील युवक अंतरवाली सराटी गावात येऊन जरांगे पाटील यांची भेट घेत होते. जरांगे यांची तपासणी करण्यासाठी वडीगोद्री येथील डॉ. शीतल कुटे व आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम आली होती. परंतु जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम