भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना दाखविले काळे झेंडे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ सप्टेंबर २०२३ | जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली या गावात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांवर पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज करून अनेक मराठा तरुण व भगिनींना जखमी केले या घटनेच्या निषेधार्थ भाजप प्रदेशाध्यक्षाना काळे झेंडे दाखविण्यात आल्याने राजकारण तापले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून अकोला येथे संवाद यात्रेसाठी जात असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना ताफा शेळद फाट्यावर पोहचताच सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवून जालना जिल्ह्यातील घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी बाळापूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. सदर आंदोलनात देवानंद साबळे गोपाल पोहरे, प्रशांत गायकवाड विष्णू अरबट ऋषिकेश साबळे, अंकित डीवरे,यांच्यासह अनेकांचा सहभाग होता यावेळी सर्व आंदोलनकर्त्यांना बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम