‘जवान’ चित्रपटात अभिनेत्री ठरली महागडी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवसापासून गदर २ ची धूम होत असतांना आता जवान या चित्रपटाची मोठी चर्चा रंगू लागली आहे. अभिनेता शाहरुख खानने हा चित्रपट सुपरहिट ठरविला असून यानंतर आता त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

जवानमध्ये शाहरुखसोबत साऊथ अभिनेत्री नयनतारा ही देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडच्या पहिल्याच प्रयत्नात तिला शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. नयनताराने जवान चित्रपटासाठी तगडी फिस घेतली आहे. नयनतारा ही साऊथची एकमेव महागडी अभिनेत्री ठरली आहे. तिने तब्बल 11 कोटी रूपये मानधन चित्रपटासाठी घेतले आहे. साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अ‍ॅटली कुमराच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे बजेट सुमारे 300 कोटी असून हा शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे. येत्या 7 सप्टेंबर 2023 रोजी ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय शाहरुखचा आगामी ‘डंकी’ हा चित्रपट देखील चांगलाच चर्चेत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम