भाजपला आरक्षण संपवायचे ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ ऑक्टोबर २०२३

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, जिल्ह्याचे प्रभारी विनायकराव देशमुख जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, योगेंद्रसिंग पाटील उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथील आंदोलनाप्रसंगी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, असे सांगतात आणि दुसरीकडे वेगळच काही सांगतात. आरक्षण प्रश्नावर ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण केले जात आहेत. मुळात म्हणजे भाजपला समाजा समाजांमध्ये वाद निर्माणकरून ‘आरक्षण व्यवस्थाच संपवायची आहे’, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला.

नाना पटोले पुढे म्हणाले की, मोदी सरकारने २०१८ मध्ये घटनादुरुस्तीकरुन राज्याचे आरक्षणाचे अधिकार काढून घेतले आहे. भाजप सरकारने २०१९ मध्ये गायकवाड कमिशनची नेमणूक केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले, अधिकार नसतांना भाजप सरकारने गायकवाड कमिशनची नेमणूक करून जनतेची व मराठा समाजाची दिशाभूल यांनी केली, असा आरोपही पटोले यांनी केला. तसेच आरक्षणाबाबत आमची भूमिका पुर्वीपासून अगदी स्पष्ट आहे, भाजपाने सत्तेत येण्यासाठी मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते मात्र, सत्तेत येताच आरक्षणाला बगल दिली असल्याची टीका ही त्यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. त्यावेळी सौम्य लाठी चार्ज करण्याचे आदेश दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. तसेच त्यांनी माफी देखील मागितली होती आणि आता पुन्हा मी तो नव्हेचची भूमिका घेत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला १ कोटी लोक जमतात हा जनतेचा मनातील सरकार विरोधी रोष आहे. तुम्ही सभा घेऊन बघत्त किती लोक येतात मग तुम्हाला समजेल, असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला. राज्यातील सरकार हे ड्रग माफियांना संरक्षण देत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम