जळगावात गंभीर गुन्हे करणारे दोघे स्थानबद्ध

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ ऑक्टोबर २०२३

जळगाव शहरातील विविध परिसरात शासकीय कामात अडथळा यासह मारहाण व दंगली सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (वय २५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) याच्यासह प्राणघातक हल्ला यासह आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार मयूर उर्फ विक्की दिलीप अलोणे (वय ३१, रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ) या दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्या दोघांना पुणे येथील येरवडासह कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी शहजाद खान याच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाचे सहा गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे याच्यावरदेखील विविध पोलिस ठाण्यात वेगवेगळया गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहे. पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अनेकदा कारवाई करुन देखील दोघ सराईत गुन्हेगारांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे व रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दोघांच्या एमपीडीएचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार शहजाद खान उर्फ लल्ला याची याची येरवडा, पुणे कारागृहात तर मयूर आलोणे याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांच्यासह रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, राजेश चव्हाण, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, पोकॉ राहूल पाटील, रवींद्र चौधरी, उमेश पवार, अखलख शेख, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक, किरण पाटील यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम