वज्रमूठ सभेला भाजपाचा विरोध ; नाना पटोले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ एप्रिल २०२३ ।  नागपुरातल्या सभेसाठी जागा कमी आहे, लोकांचा विरोध आहे, अशा अफवा पसरवल्या. मात्र, या सभेला भाजपचा विरोध असल्याचे दिसते. जवळपास पन्नास ते साठ हजार लोक बसतील अशी व्यवस्था इथे केली आहे. बाजूच्या जागा आहेत. एक लाखाच्या वर याठिकाणी लोक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सगळी भीती लक्षात घेता भाजपने रणनीती थेट कोर्टापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या मनामध्ये असलेली या धास्तीतून ते या सभेला विरोध करत होते. या सभेत एका पक्षातून दोन लोक बोलणार असल्याचे ते म्हणाले.

नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभास्थळाची पाहणी केली. या सभेला जवळपास लाखभर लोक गर्दी करतील, असा दावा यावेळी त्यांनी केला.

नाना पटोले म्हणाले की, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे काही वर्णन पुलवामाच्या घटनेचे केले आहे, हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उत्तर दिले पाहिजे. देशाच्या सुरक्षेत आपल्याच सैन्याचा मृत्यू त्या ठिकाणी घडवण्याचे हे कृत्य आहे. देशाच्या जनतेत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पंतप्रधानांनी याबाबत उत्तर द्यावे, हे उत्तर घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम