मणिपूर प्रमाणे राज्यातही दंगली घडविण्याचा भाजपचा प्लान ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑगस्ट २०२३ | राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट राज्यातील भाजप व सत्ताधारीवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले कि, देशातील मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात देखील दंगली घडवण्याचा कट असल्याचा भाजपचे काही गुरुजी मंडळी राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, काही जण महाराष्ट्रात आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महाराष्ट्राची जनता अशा प्रयत्नांना बळी पडणार नाही. महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या व्यक्ती महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहेत. अशा व्यक्तींबद्दल कुणी आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर त्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली पाहीजे. मात्र, हे सरकार गुंडांना पाठीशी घालत आहेत. संजय राऊत म्हणाले, सांगलीचे मनोहर भिडे हे आपले गुरुजी आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यांच्या गुरुजींनी गांधींपासून नेहरूंपर्यंत, साईबाबांपासून महात्मा फुलेंपर्यंत सगळ्यांची निंदा सुरू केली आहे. तणाव निर्माण करून दंगली भडकवण्याची ही ‘सुपारी’ आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम