पोलिसांचा फोन वाजला अन लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोटची धमकी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑगस्ट २०२३ | देशात गेल्या काही महिन्यापासून काही शहरासह दिग्गज नेत्यांना ठार मारण्याच्या धमक्या सुरु असतांना आज देखील पुन्हा एकदा मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. त्यामुळं मोठी खळबळ उडालीये. हा फोन आज सकाळी आला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आज सकाळी हा फोन आला असून फोनवर बोलताना संबंधित व्यक्तीनं मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं.

अधिक माहिती अशी की, यावेळी महिला पोलिस शिपायानं संबंधित व्यक्तीकडून अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र कुर्ला, ठाणे, कल्याण टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणं सांगितली. त्या व्यक्तीला त्याच्या ठिकाणाबाबत विचारले असता, त्यानं तो जुहू विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचं सांगत फोन कट केला. काही वेळानं फोन करणाऱ्यानं त्याचा मोबाईल बंद केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना संबंधित पोलिस ठाण्याला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम