भाजपचा सुपड़ा साफ होणार ; खा.संजय राऊत !
बातमीदार | ७ नोव्हेबर २०२३
देशातील काही राज्यात विधानसभा निवडणुका सुरु आहे. यावरून सत्ताधारी विरोधकावर टीका करीत असतांना आता ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी देखील सत्ताधाऱ्यावर टीका केली आहे.
खा.राऊत म्हणाले कि, देशात इंडिया आघाडी भक्कम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांनी इंडिया आघाडीची चिंता करणे सोडावे, असा टोला शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच पाच राज्यांतील निवडणुकीत इंडिया आघाडी विजयी होईल आणि भाजपचा सुपड़ा साफ होईल, असा दावाही देखील त्यांनी केला आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांना गळाला लावण्याचे भाजपचे पुन्हा प्रयत्न सुरू असून चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, नितीश कुमार इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपने करू नये. ओमर अब्दुल्ला लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव आदी इंडियाचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. देशातील सत्ताधाऱ्यांविरोधात इंडियाने नारा दिला आहे. इंडियाच्या माध्यमातून २०२४ मध्ये भाजपाचा दारुण पराभव करायचा आहे. त्यामुळे इंडियाची स्थापना झाल्याचे राऊत म्हणाले.
पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर घाबरलेल्या सरकारने विरोधकांच्या इंडिया नावामुळे देशाचे नामकरण भारत केले. इतकेच नव्हे ज्या ज्या ठिकाणी इंडिया आहे, त्या ठिकाणी नावे बदलली आहेत. मात्र भाजपने कितीही प्रयत्न केला तरी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरममध्ये आम्हीच जिंकणार आहोत, असे राऊत म्हणाले. आम्हाला काय करायला हवे, हे सांगण्यापेक्षा स्वतःचे घर आधी सांभाळा, असा सल्ला राऊत यांनी दिला. विधानसभा निवडणुका झाल्या की, आम्ही पुन्हा एकत्र बसणार आहोत आणि राष्ट्रीय स्तरावरील सीट शेअरिंगचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचे राऊत यांनी सांगितले
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम