१२ वी उत्तीर्ण तरुणांना संधी : ९ नोव्हेबर असेल अंतिम तारीख !
बातमीदार | ७ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक तरुण १२ वी पास असून त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अनेक परीक्षा देत आहेत, त्याच तरूणासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नुकतेच महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिपाई पदाच्या 9 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण
भरले जाणारे पद – शिपाई
पद संख्या – 9 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स बिल्डिंग, थापर हाऊस, डॉ. व्ही. बी. गांधी रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई 400001
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (12 वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – रुपये 25,000/- दरमहा.
असा करा अर्ज
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम