बॉलिवूड अभिनेता आमिर खान घेणार ब्रेक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ नोव्हेबर २०२२ ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा फ्लॉप झाल्यानंतर आता त्याच्या नवीन प्रोजेक्टविषयी चर्चा जोरदार असतानाच आमिर खानच्या आगामी ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून बातम्या समोर येत आहेत. अखेर यासंबंधीची माहिती समोर आली आहे. आमिर खानने अलीकडेच दिल्लीत त्याच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमात ‘चॅम्पियन्स’बद्दल काही खुलासे केले. आमिर खान त्याच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत गेला होता. जिथे त्याने ‘चॅम्पियन्स’ बद्दल एक खास अपडेट शेअर केली आहे.

आमिर खानने सांगितले आहे की, ‘ही एक अप्रतिम स्क्रिप्ट आहे. ही एक सुंदर कथा आहे आणि हा एक हृदयस्पर्शी आणि सुंदर चित्रपट आहे, परंतु मला वाटते की मी थोडा ब्रेक घ्यावा. मला माझ्या कुटुंबासोबत रहायचे आहे, मला माझ्या आई आणि माझ्या मुलांसोबत राहायचे आहे.’ आमिरला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. म्हणूनच त्याने चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत अभिनयातून ब्रेक घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्याने उघड केले आहे. तो पुढे म्हणाला, “मला वाटते की मी 35 वर्षांपासून काम करत आहे आणि मी माझ्या कामावर एकट्याने लक्ष केंद्रित केले आहे. मला असे वाटते की माझ्या जवळच्या लोकांसाठी हे योग्य नाही. हिच वेळ आहे की, मला वाटते की मी काही काम करू नये आणि त्यांच्यासोबत वेळ घालवावा आणि जीवनाचा अनुभव वेगळ्या पद्धतीने घ्यावा. मी पुढचे वर्ष-दीड वर्ष मी अभिनेता म्हणून काम करणार नाही.” आमिर खान पुढे म्हणाला, ‘मी ‘चॅम्पियन्स’ची निर्मिती करणार आहे कारण मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. मला वाटते ही एक चांगली कथा आहे. आमिर खान प्रॉडक्शन्स, सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स, इंडिया आणि 200 नॉटआउट प्रॉडक्शन्स या चित्रपटाची सहनिर्मिती करणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम