मोठी बातमी : मुख्यमंत्री शिंदे पुन्हा गुवाहाटी दौऱ्यावर ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ नोव्हेबर २०२२ महाविकास आघाडी सरकार असतांना शिंदे यांनी गुवाहाटीला जात ठाकरे गटात मोठे खिंडार पडले होते, त्यानंतर राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून राज्यात नव्हे तर देशात गुवाहाटी दौरा प्रसिद्ध झालेला होता. पुन्हा मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटी दौरा करणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.

राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे ४० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असून दौऱ्याची तारीख ठरली आहे. २१ नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा एक दिवसीय दौरा आहे. दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन असे सांगितले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. पण दौऱ्याची तारीख निश्चित नव्हती अखेर आज दौऱ्याची तारीख समोर आली आहे. 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहे. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत असल्याचे बोलले जात आहे. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांची देखील ते भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम