मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याचे टोचले कान !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑगस्ट २०२३ | मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना चांगलेच झापले आहे. तुम्हाला न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटते का? अशा शब्दांत न्यायालयाने राणा दाम्पत्याचे कान टोचले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र, वारंवार बजावूनही राणा दाम्पत्य सुनावणीसाठी गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. गुरूवारी (ता. 10) या प्रकरणी सुनावणी झाली. गुरुवावारीही राणा दाम्पत्य सुनावणीसाठी कोर्टात हजर राहीले नाही. न्यायाधीश राहुल रोकडे हे या प्रकरणाची सुनावणी करत आहेत. राणा दाम्पत्याच्या कोर्टात गैरहजेरीची न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली. संसदेचे अधिवेशन सुरु असल्यामुळे खासदार नवनीत राणा यांची गैरहजेरी समजू शकतो, पण आमदार रवी राणा गैरहजर का? असा सवाल यावेळी कोर्टाने विचारला.

विशेष म्हणजे या सुनावणीवेळी राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट, सरकारी वकील सुमेर पंजवानी हेदेखील गैरहजर होते. केस तपासाधिकारीही सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कुणीच कोर्टात हजर नव्हते. यामुळे न्यायाधीश चांगलेच भडकले. न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे, अशा शब्दांत न्यायाधीशाने सर्वांना झापले. सुनावणीसाठी राणा दाम्प्त्याच्या वकीलांसोबतच सरकारी वकीलही सुनावणीला गैरजर होते. त्यांचे ज्युनिअर मात्र हजर होते. या ज्युनिअर वकिलांना कोर्टाने यावेळी कानपिचक्या दिल्या. तेदेखील वेळेवर हजर झाले नाही तर धावपळ करून कोर्टात पोहोचल्याचे पाहताच सरकारी वकील सुमेश पंजवानी यांच्यावरही कोर्टाने कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 28 ऑगस्टरोजी होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम