दोन्ही पवार एकच ; अजित पवारांच्या महिला नेत्याचे मोठे विधान !
बातमीदार | ३० ऑगस्ट २०२३ | राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठी फुट पडली असून आता पक्षात दोन गट झाले आहे. मात्र अजूनही कार्यकर्ते संभ्रमात असल्याने दोन्ही नेत्याचे वेगवेगळे विधान होत आहे. यावर पुन्हा एकदा अजित पवार गटातील महिला नेत्यांच्या विधानाने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादीतील अनेक आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना पाठींबा दिला आहे. तर काही आमदार अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांना आपलं समर्थन दिलं आहे.
एकीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटातील नेते एकमेकांवर टीका करत असताना, दुसरीकडे रुपाली चाकरणकर यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहे, भविष्यात आम्ही पुन्हा एकत्र येणार असा दावाही त्यांनी केला आहे. दुसरीकडे शरद पवार आमच्या ह्रदयात असून त्यांच्यावर टीका करणार नाही, असं विधान अजित पवार यांच्यासोबत गेलेले दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या गटातील दोन बड्या नेत्यांनी ही विधाने केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून एकदा उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी पुण्यात माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शेवटी कुटुंब हे कुटुंबच असतं. एकमेकांमध्ये मतभेद असले, तरी मनभेद कुणामध्येही नाही. भविष्यात आम्ही पुन्हा एकत्र येऊ, अजितदादांनी आपली वैचारिक भूमिका मांडली आहे, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री दिलीप पाटील यांनी सुद्धा एका कार्यक्रमात बोलताना अशाच प्रकारचं विधान केलं आहे. आदरणीय पवार साहेब, हे माझ्या ह्रदयात आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही एक शब्द पण वाकडा बोलणार नाही, आम्ही त्यांना सोडणार नाही, असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम