कालीचरण महाराज पुन्हा अडचणीत : अखेर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

बातमीदार| ३० ऑगस्ट २०२३ | आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच राज्यातील जनतेत चर्चेत असलेले कालीचरण महाराज पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांच्यावर आता भडकावू भाषण दिल्याप्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्यात कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सनसिटीरोड जवळ छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त “हिंदू जनजागरण सभा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कालीचरण महाराज यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रमात बोलताना जात, धर्म, भाषा व प्रादेशिक गट यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण होईल आणि हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मांच्या विरोधात भाषण केल्याचा आरोप कालीचरण महाराजांवर लावण्यात आला आहे. याच प्रकरणात कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग यांच्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, आपल्या भाषणामुळे अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही भडकावू भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराजांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम