ब्रेकिंग : मध्यरात्री समृद्धी महामार्गावर १६ कामगारांचा दुर्देवी मृत्यू !
बातमीदार | १ ऑगस्ट २०२३ | राज्यातील सर्वात मोठा मानला जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अनेक दिवसापासून छोटे मोठे अपघाताची मालिका सुरु असून आज पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या सुमारास ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे.
राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेच दिली. गर्डर मशिनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मतृांच्या कुटुंबीयांना मदत देखील केली जाईल असे दादा भुसे म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यामध्ये 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याआधीच काही तास ही दुर्देवी घटना घडली आहे.
दरम्यान, सध्या NDRF कडून डॉग स्कॉडच्या माध्यमातून पुलाच्या ढिगाराखाली सर्च ऑपरेशन सुरु आहे. आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे TDRF ची एक तुकडी घटनास्थळावर दाखल झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु आहे. हे काम येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा शंभर किलोमीटरचा टप्पा आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण 600 किमीचा रस्ता खुला झाला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम