ब्रेकिंग : धावत्या रेल्वेत जवानाने केला गोळीबार ; ४ जण ठार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ जुलै २०२३ | आज पहाटे घडलेल्या घटनेने राज्य हादरले असून हि घटना मुंबई-पालघर दरम्यान घडल्याची एक बातमी समोर आली आहे. जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने 4 जणांची गोळ्या झाडून हत्या केली. जवानाने आपल्या स्वयंचलित रायफलमधून गोळीबार केला आणि यामध्ये 3 प्रवासी आणि एक RPF जवानाचा मृत्यू झाला. आरोपी कॉन्स्टेबल चेतन कुमार चौधरी याने प्रथम एस्कॉर्ट ड्युटी इन्चार्ज टिका राम मीणा यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर दुसऱ्या डब्यात जाऊन तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली.

पालघर आणि मुंबईदरम्यान दहिसरमध्ये गोळीबार झाला. गोळी झाडणाऱ्या पोलीस हवालदाराला मीरा रोडजवळ पकडले आहे. हवालदार मानसिक तणावाने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना आज ३१ जुलै पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपीचा हेतू काय होता आणि त्याने ही गोळी का चालवली हे समजू शकले नाही. सुदैवाने या गोळीबारात आणखी प्रवासी जखमी झाले नाहीत. चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार होताच ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस रेल्वेतील प्रवाशांचे जबाबही नोंदवत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पश्चिम रेल्वेने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबलने चालत्या जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्याने RPF ASI आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घालून दहिसर स्टेशनजवळ ट्रेनमधून उडी मारली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम