ब्रेकिंग न्यूज: खराब हवामानामुळे जळगावला उतरणारे विमान इंदोरला वळवले…!

बातमी शेअर करा...

जळगाव – हैदराबादहून जळगावला येणारे विमान खराब हवामानामुळे जळगाव विमानतळावर उतरू शकले नाही. ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान सोमवारी रात्री १० वाजता इंदोरला उतरविण्यात आले, ज्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

‘फ्लाय९१’ या विमान कंपनीचे विमान गोव्याहून दुपारी जळगावला आले होते. जळगावहून हैदराबाद आणि पुन्हा हैदराबादहून जळगावला रात्री ९ वाजता येणार होते. परंतु खराब हवामानामुळे जळगाव विमानतळावर उतरू न शकल्यामुळे विमानाला इंदोर येथील अहिल्याबाई होळकर विमानतळावर उतरवावे लागले. या घटनेमुळे विमानातील तसेच जळगाव विमानतळावर गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम