जिओसह एअरटेलला देणार बीएसएनएल टक्कर ; केद्रीय मंत्र्याचे वक्तव्य !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जानेवारी २०२३ देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने 5G बाबतम महत्त्वाचं विधान केले आहे. टेलिकॉम क्षेत्रातून हि मोठी बातमी समोर आली आहे.

BSNL ने 4G नेटवर्कसाठी TCS आणि C-DOT च्या नेतृत्वाखालील टीम शॉर्टलिस्ट केली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली. ओडिशामध्ये 5G सर्व्हिसचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 

ते म्हणाले की, BSNL देशभरात 2024 मध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. BSNL चं 5G नेटवर्क आल्यानं आता जिओ आणि एअरटेलला जोरदार टक्कर दिली जाणार आहे. संपूर्ण ओडिशात 2 वर्षात 5G सेवा पूर्णपणे सुरू केली जाणार असून, आजपासून पहिल्या टप्प्यात भुवनेश्वर आणि कटकमध्ये 5G सेवा दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. 26 जानेवारी 2023 पूर्वी राज्यात 5G सेवा सुरू करण्याचे आश्वासन वैष्णव यांच्याकडून देण्यात आले होते. मोदी सरकारने राज्यातील दूरसंचार कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी 5,600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ओडिशातील 100 गावांमध्ये 4G सेवांसाठी 100 टॉवर्स सुरू करण्यात आले आहेत. या दरम्यान राज्यात जागतिक दर्जाच्या संपर्क सुविधा असलेले 5000 मोबाइल टॉवर्स बसवले जातील असेही वैष्णव यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम