बुमराहच्या यॉर्करने उडवला सुनील नरेनचा त्रिफळा, पाहा व्हायरल व्हिडिओ

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ मे २०२४ । आयपीएल २०२४ मधील ६०वा सामना केकेआर आणि मुंबई इंडियन्स (KKR and Mumbai Indians) यांच्यात रंगला. पावसामुळे लांबलेला हा सामना १६ षटकांचा करण्यात आला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुंबईच्या गोलंदाजांनी डावाच्या सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. पहिल्याच षटकात नुवान तुषाराने फिल सॉल्टला ६ धावांवर बाद केले. पण दुसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहचा केकेआरचा बलाढ्य फलंदाज सुनील नरेनला क्लीन बोल्ड केले. जसप्रीत बुमराहचा स्विंग होणारा चेंडू त्याला समजला नाही आणि पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. नरीनचा फॉर्म पाहून त्याच्या गोल्डन डकचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जसप्रीत बुमराहच्या यॉर्करचे सुनील नरेनकडे उत्तर नव्हते. नरेनला वाटलं की चेंडू स्टंप मिस करेल, पण उशिरा आलेल्या या इनस्विंग चेंडूने बेल्स उडवल्या. अशा प्रकारे तो गोल्डन डकचा बळी ठरला. यासोबतच सुनीलने एक लाजिरवाणा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. पुरुषांच्या टी-२० (T-20) क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा (४४) शून्यावर बाद होणारा तो खेळाडू ठरला आहे.

Mumbai Indians: नाराज असलेला रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंच्या यादीत सुनील नरेन (४४) अव्वल स्थानावर आहे. या यादीत ॲलेक्स हेल्स (४३) दुसऱ्या स्थानावर, राशिद खान (४२) तिसऱ्या स्थानावर, पॉल स्टर्लिंग चौथ्या स्थानावर (३२), ग्लेन मॅक्सवेल (३१) आणि जेसन रॉय (३१) पाचव्या स्थानावर आहेत. याशिवाय नरेन हा आयपीएलमध्ये दुसऱ्या सर्वाधिक (१६) वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. या यादीत दिनेश कार्तिक (१७), ग्लेन मॅक्सवेल (१७) आणि रोहित शर्मा (१७) पहिल्या स्थानावर आहेत.

इम्पेरियलच्या विद्याथ्यांचे कराटे स्पर्धेत यश

पावसामुळे सामना दोन तास १५ मिनिटे उशिराने सुरू झाला आणि षटकेही कमी झाली. सामना ११६-१६ षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईच्या गोलंदाजांनी केकेआरच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. केकेआरने १६ षटकांत सात गडी गमावून १५७ धावा केल्या. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने २१ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने प्रत्येकी दोन बळी घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम