स्मिताताई वाघ व रक्षाताई खडसे यांना मतदान देऊन मोदीजींचे हात बळकट करु – सुरेशदादा जैन

सुरेशदादा जैन यांचा भाजपला पाठिंबा

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ मे २०२४ । माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन (Former minister and senior leader Suresh Jain) यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. सक्रीय राजकारणात नसले तरी ते ठाकरे गटामध्ये होते. परंतु, राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी च्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले.

एअर इंडिया एक्सप्रेसचे संकट संपले, सर्व क्रू मेंबर्स कामावर परततील पण…, ४ तासांच्या बैठकीनंतर अखेर तोडगा निघाला

भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत काढलेल्या प्रसिद्धीपत्रकार सुरेशदादा जैन यांनी म्हटले की, जळगावकरांनी मी माझ्या परिवाराचा सदस्य मानतो. मी कायम जळगावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलेलो आहे. सद्य स्थितीत भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी उद्योगाची साखळी निर्माण करणे अगदी गरजेचे आहे. त्या माध्यमातूनच रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

जैन पुढे म्हणाले कि, २०१४ पासून मी राजकारणात सक्रीय नाही. वयोमानानुसार आणि तब्येतीच्या कारणास्तव राजकीय रणांगणात उतरण्याची माझी इच्छा नाही. मात्र समाजकारण माझ्या रक्तातच आहे. मागच्या ४५ वर्षांपासून केलेल्या विकासकामांचा अनुभव माझ्या पाठिशी आहे. राजकीय जीवनात मी वेगवेगळ्या पक्षात राहिलो आणि जनतेने मला भरभरुन प्रेम दिले.

शेवटी माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन म्हणतात कि, मोदीजींच्या स्वप्नातील भारत घडावा आणि मी पाहिलेलं जळगावच्या विकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी मी भारतीय जनता पक्षाला जाहीर समर्थन देत आहे. जळगाव जिल्हावासियांना माझी आग्रहाची विनंती आहे की, आपले बहुमुल्य मत जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कमळ या चिन्हाला मतदान देऊन मोदीजींचे हात बळकट करुया, असे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी केले.

‘आरटीई’ प्रवेशांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… जाणून घ्या कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सन १९८० मध्ये खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश केला. परंतु त्या अगोदर त्यांनी एक धाडसी काम केले होते. आणिबाणी संपल्यानंतर देशभरात जनता पक्षाची राजवट होती, त्या काळात माजी पंतप्रधान (स्व.) इंदिरा गांधी यांचा जळगाव येथे दौरा होता. त्या काळी हेलीकॉप्टर उतरविण्यासाठी पोलीस मैदान या ठिकाणी एकमेव सुविधा होती. मात्र त्यावेळच्या सरकारने त्यांना हेलीकॉप्टर उतरविण्यास परवानगी नाकारली.

त्यामुळे त्यांच्या जळगाव दौऱ्याची अडचण निर्माण झाली होती. परंतु सुरेशदादा जैन यांनी त्यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन आपल्या खासगी मालकीच्या खानदेश मिलच्या जागेत हेलीकॉप्टर उतरविण्यास जागा दिली होती. इंदिरा गांधी या सुध्दा हेलीकॉप्टरने जळगावी आल्या व त्या मीलच्या जागेत उतरून त्यांनी जळगावात रोड शो करीत सभा घेतली होती. त्यावेळी ही सभा संपूर्ण राज्यभरात चर्चेत होती.

सन १९८० मध्ये सुरेशदादा जैन हे कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले व त्यांच्या राजकीय कारकिर्दीस प्रारंभ झाला. त्यानंतर जळगाव नगरपालिकेत त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले, त्यात त्यांना यश मिळाले आणि जळगावचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले. सुरेशदादा जैन यांनी पक्षाबाबत निष्ठेचे कधीच ढोंग केले नाही. जनतेसाठी आपण अनेक वेळा पक्ष बदलू असे त्यांनी जाहीर वक्तव्य केले होते. त्यांनी जीवनात अनेक पक्ष बदलले आहेत. परंतु ज्या पक्षात ते गेले त्या ठिकाणी त्यांनी निष्ठेने काम केले. राज्य सरकारकमध्ये मंत्री म्हणूनदेखील त्यांनी काम केलं आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम