‘कार्यकर्ता महाकुंभ’ ला जाताना भाजप कार्यकर्त्यांच्या बसचा अपघात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ सप्टेंबर २०२३

देशभरात भाजप कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम घेत असतांना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन येणारी बस सोमवारी पार्क केलेल्या ट्रकला धडकली.

या अपघातात बसमधील 39 भाजपा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. ‘कार्यकर्ता महाकुंभ’ मेळाव्यासाठी हे कार्यकर्ते चालले होते. आज 25 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘कार्यकर्ता महाकुंभ’ला संबोधित करणार आहेत. भोपाळमध्ये हा मेळावा होत आहे. खरगौन जिल्ह्यात हा अपघात झाला. कासरावड जवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलय.

अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणारे भाजपा कार्यकर्ते खापरजामली, रुपगढ आणि राय सागर भागातील आहेत. जनसंघाचे सहसंस्थापक दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘कार्यकर्ता महाकुंभ’च आयोजन केलं आहे. यावर्षी मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक होणार आहे. भाजपकडून आतापासूनच या निवडणुकासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मागच्या 45 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा तिसरा मध्य प्रदेश दौरा आहे. काँग्रेससोबत मध्य प्रदेशात भाजपाच अटी-तटीचा सामना होऊ शकतो. सत्ता टिकवण हे भाजपासमोरील मुख्य आव्हान आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम