प्रसादाच्या सेवनाने ४६ भाविकांना विषबाधा

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ सप्टेंबर २०२३ | देशासह राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतांना एक धक्कादायक बातमी नांदेड जिल्ह्यातून समोर आली आहे. महालक्ष्मी सणाच्या प्रसादाचे सेवन केल्यानंतर किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावातील 46 जणांना विषबाधा झाल्याचे समाेर आले आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील दाेन दिवसापासून गौराई सणाचा उत्सव सुरू आहे. महालक्ष्मी अर्थात गौराई सणाच्या प्रसादाचे सेवन केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावातील 46 जणांना विषबाधा झाली. गौराई सणानिमित्त घरोघरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या जेवणातून विषबाधेचा हा प्रकार घडला आहे. या घटनेतील बाधितांवर किनवटच्या गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांत लहान थोरांसह बालकांचा देखील समावेश आहे. यातील सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम