महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात : १२ ठार तर २३ प्रवासी जखमी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ ऑक्टोबर २०२३

राज्यातील समृद्धी महामार्गावर गेल्या काही वर्षापासून अपघातांची मालिका सुरुच असून आज पुन्हा एकदा याच महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मिनी बसचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. त्याच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कसा झाला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

समृद्धीवरील टोल नाक्याजवळ एक ट्रक अचानक समोर आला, अशी माहिती ड्रायव्हरने दिल्याचं पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी सांगितलं. ट्रक कमी वेगात होता की थांबला होता याबाबत पोलीस तपास करत आहेत. समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनीच हा ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते, अशी माहिती काही जणांकडून मिळत आहे. याबाबत सविस्तर चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया यांनी दिली.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम