बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा बस पलटी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जुलै २०२३ ।  राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात मलकापूर- बुलडाणा बसचा झाला असून या बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ही बस थेट राजूर घाटात पलटी झाली. बसमध्ये 55 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सध्या बाहेर काढण्यात आले. ब्रेक फेल झाल्यानेच हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. बस राजूर घाटात आल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाले. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. ही बस मलकापूरहून बुलडाणाकडे निघाली होती. मोहेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे माहिती मिळाली आहे. बस क्रमांक 8275 चा जॉईंटर निसटला आणि बस मागे मागे जाऊ लागली. दरम्यान ब्रेक दाबत असताना एसटी बस पलटी झाली, अशी प्राथमिक माहिती बुलडाणा आगाराकडून माहीती मिळाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम