मोदींच्या सभेला जाणाऱ्या बसेस फोडल्या !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ ऑक्टोबर २०२३

राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज दौरा होत असतांना राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. तर मराठा बांधवांच्या या आक्रमक भूमिकेचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यालाही बसल्याचे पाहायला मिळाले. अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या एसटी बसेस फोडल्याची घटना घडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीमध्ये आले असून विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जाण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी बसचे नियोजन करण्यात आले.

मात्र सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्याने अनेक गावात पुढार्‍यांना बंदी करण्यात आली आहे. शिर्डी येथील सभेसाठी लोकांना घेवून जाण्यासाठी मंगरुळ येथे गेलेल्या एसटी बस (क्र. एमएच. 14, बीटी 2158)च्या अज्ञातांनी काचा फोडल्या. यामुळे ही बस चालक पी. पी. फुंदे यांनी पुन्हा शेवगाव आगारात पुन्हा आणली. सध्या बसचा पंचनामा करण्याचे काम सुरु असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, मराठा बांधवांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याला जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. त्यामुळेच लोकांना शिर्डी येथे घेवून जाण्यासाठी गेलेल्या बसेसही अनेक गावातून रिकाम्या परतत असल्याचे चित्र आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम