ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महराज सातारकर यांचे निधन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ ऑक्टोबर २०२३

राज्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे आज दि.२६ ऑक्टोबर रोजी निधन झाले असून त्यांचे वय ८७ वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बाबा महाराज सातारकर यांचे पार्थिव आज दुपारी तीन वाजेनंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी स्थान मिळवले होते. आपल्या निरुपणाच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्माच्या प्रचाराबरोबरच सामाजिक प्रबोधन देखील केले. त्यांचे रोखठोक विचार आणि आचरणाविषयी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम