बिझनेस आयडिया : ५ हजारात सुरु करा ‘हे’ उद्योग !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ ।  देशातील अनेक तरुण आज देखील बेरोजगारीचा मोठा सामना करीत असून त्यांना कोणता ना कोणता बिझनेस सुरु करायचा आहे. तुम्हीही अशाच एखाद्या बिझनेसच्या शोधात असाल ज्यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगला पैसा कमावता येईल.

तर आज आम्ही तुम्हाला एक खास बिझनेस आयडिया देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला मोबाईल एक्सेसरीज बिझनेसविषयी माहिती देणार आहोत. वाढत्या डिजिटलायझेशनमुळे स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढला आहे. अशा वेळी चार्जर, इअरफोन, पंखा, लाईट, विविध प्रकारच्या केबल, लाइटिंग स्पीकर, मोबाईल स्टँड, कार्ड रीडर, साउंडबार स्पीकर आदी मोबाईल अ‍ॅक्सेसरीजला मोठी मागणी आहे.तुम्ही आता हा व्यवसाय सुरू केल्यास, तुम्ही लगेच बंपर कमाई सुरू करू शकता. या बिझनेसची खास गोष्ट म्हणजे हा बिझनेस कोणत्याही सिझमध्ये चालतो. अशा परिस्थितीत ते तुम्हाला वर्षाच्या 12 महिन्यांसाठी नफा देऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या बिझनेसविषयी सविस्तर…

मोबाईल अ‍ॅक्सेसरीजचा बिझनेस कसा सुरू करायचा? हा व्यवसाय सुरू करताना, आजकाल कोणत्या अ‍ॅक्सेसरीज जास्त ट्रेंडमध्ये आहेत ते शोधा. त्यानंतरच वस्तू खरेदी करा. एकाच वेळी अनेक वस्तू खरेदी करू नका.

वेगवेगळ्या कॅटेगिरीच्या वस्तू खरेदी केल्यास त्याचा फायदा ग्राहकांना होईल. त्यांना कॅटेगिरीमधील वस्तू पाहायला मिळतील. अशा वेळी, या सर्व वस्तूंपैकी ग्राहक एक तरी वस्तू खरेदी करेलच. तुम्‍हाला हवं असल्‍यास तुम्‍ही सार्वजनिक ठिकाणी छोटासा स्‍टॉल लावून किंवा सार्वजनिक परिसरात फिरून हा बिझनेस करू शकता. मोबाईल अ‍ॅक्सेसरीजमधून कमाई हा असा व्यवसाय आहे, जो पार्ट टाइम किंवा फुल टाइम करता येतो. या व्यवसायात खर्चाच्या 4-5 पट नफा सहज मिळतो. समजा तुम्ही एखादी वस्तू 12 रुपयांना विकत घेतली असेल तर तुम्ही ती वस्तू 50 रुपयांना सहज विकू शकता. ग्राहकही ते आनंदाने खरेदी करतील. याशिवाय या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हवे असल्यास सुरुवातीला 5 हजार रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम