‘या’ अभिनेत्यासह अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ ।  सध्या जगभरातील अनेक अभिनेते असो वा राजकारणी सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असल्याचे दिसून येत असते व त्यातून अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. कोणत्याही गाण्यावर अचानक रील्स व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटीच काय तर सामान्य माणूसही या रीलच्या मागे वेडा झाला आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केलाय. सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या रीलवरच त्यानेही रील बनवलं आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत आहे अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर इतक्या वर्षांनी दोघांना एकत्र पाहून चाहते खूश झालेत.

प्रतिक्षा लोणकर आणि श्रेयस तळपदे या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेयसचा पहिला आणि सुपरहिट सिनेमा ‘इक्बाल’ मध्ये प्रतिक्षा लोणकर यांनी त्याच्या आईची भूमिका साकारली होती. तसंच प्रतिक्षा लोणकर यांच्या गाजलेल्या ‘दामिनी’ या मराठी मालिकेतही श्रेयस होता. श्रेयसने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यामध्ये श्रेयससोबतच प्रतिक्षा यांचाही जबरदस्त उत्साह आहे. ‘इक्बाल आणि त्याची आई इक्बालचं क्रिकेटमधील साजरे करत आहेत.’ असं कॅप्शन त्याने व्हिडिओला दिलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम