व्यापारी गड्ड्यात पडून गंभीर जखमी!; संबंधित ठेकेदारावर कार्यवाहीची मागणी

सावदा उपबाजार समितीच्या आवारात व्यापारी गड्ड्यात पडून गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ६ एप्रिल २०२४ | रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंतर्गत असलेल्या सावदा उपबाजार समिती आवारात नव्याने शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी खोदलेल्या खड्ड्यात सावदा येथील धान्याचे व्यापारी जगन प्रेमचंद नेमाडे मोटरसायकलचालवत असता ते खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सामोरे आली आहे.

शनिवारी दि. ६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास व्यापाराचे काम आटोपून दररोज प्रमाणे घरी परतत असताना सदर घटना घडली असून जगन नेमाडे यांच्या छातीच्या बरगड्या फॅक्चर झाल्या आहेत. तसेच हाताला मुक्का मार देखील लागला आहे. डॉ. पिंपळे यांच्या दवाखान्यात उपचार सुरू असून सावदा उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक गोळा झाले होते.

नव्याने व्यापारी संकुलाचे बांधकाम होत असलेल्या सदर जागेस कोणतेही सुरक्षा साधनाचे तजवीज न करता हे काम सुरू केल्याने ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने व्यापारी थोडक्यात बचावले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी व्यापारी रितेश पाटील यांनी केली आहे.

दरम्यान आधीच बाजार समिती आवारातील अर्धी जागा ही पणन महासंघाला कोल्ड स्टोरेज साठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ९९ वर्षाच्या करारावर दिली असल्याने गुरांच्या बाजारावर परिणाम झाला आहे .बाजार समितीत जागे अभावी गुरांना बाहेर थांबवून व्यवहार करावे लागत असून त्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधल्यास अत्यल्प जागा शिल्लक राहील व परिणामी गुरांच्या बाजारावर मोठा परिणाम होईल.

त्यामुळे शेतकऱ्यांनी या शॉपिंग कॉम्प्लेक्सला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कॉम्प्लेक्स चे काम बंद करावे अशी मागणी आता लावून धरली आहे. बाजार समिती सभापती सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, सदर घटनेबाबत संपर्क साधला अस्ता – “मला काही माहिती नाही मी बाहेरगावी आहे माहिती घेऊन बोलतो” असे बाजार समिती सभापती सचिन पाटील यांनी सांगितले.

बाजार समिती संचालक सय्यद अजगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबंधित ठेकेदाराला सकाळी नोटीस बजावण्यात येणार आहे व योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम