तरी मी सगळीकडेच आहे ; शरद पवारांची गुगली !
बातमीदार | १७ नोव्हेबर २०२३
राज्यात सध्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची धुरा साभाळत आहे पण अनेक राजकीय नाट्य घडत असतांना अजित पवार नाराज असल्याच्या देखील चर्चा जोर धरीत असतांना आता शरद पवारांनी एक गुगली टाकल्याने राजकीय चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहे.
कृषिनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे यांच्या वतीने द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे गुरुवारी माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले कि, सध्या मी कुठेच नाही, पण तरीदेखील सगळीकडेच आहे. त्यामुळे ते प्रश्न कसे सोडवून घ्यायचे हे मला माहीत आहे, याची तुम्ही काळजी करू नका, अशी गुगली देखील त्यांनी टाकली आहे. मी जेव्हा या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्या काळातही दुष्काळ होता. त्यावेळी विविध कामे सुरू करून पाच लाख लोकांना दुष्काळी कामे दिली. त्यामुळे दुष्काळातून शेतकरी बाहेर आले होते. मी राज्याचा मुख्यमंत्री, नंतर केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतीविषयक भरपूर कामे केली. केंद्रीय कृषिमंत्री असताना ६७ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांचे पैसे ज्यांनी लाटले अशा सर्व लोकांची यादी द्या, त्या नेत्यांचा मी बंदोबस्त करतो आणि अशांना नेता म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका त्यांनी केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम