आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट ; चर्चेला उधान !
दै. बातमीदार । १० मे २०२३ । राज्यातील ठाकरे गटाचे नेते व युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची नुकतीच भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तीन घोटाळ्यांची माहिती राज्यपालांना दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. या भेटीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे.
गेल्या सात-आठ महिन्यात प्रशासकाच्या अंधाधुंदी कामामुळे मोठे घोटाळे होते. बिल्डर कॉन्ट्रक्टरच्या सरकारने मुंबईत सहा हजार कोटींचा रस्त्याचा घोटाळा केला आहे. अनेक नगरसेवकांनी याबाबत तक्रार केली आहे. मात्र कारवाई करण्यात आली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील सध्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत. मी त्यांना चर्चेला येण्यास सांगितले. मात्र ते येत नाहीत आहेत. ते कधी शेतात तर कधी गुवाहाटीला पळून जातात.
१६० कोटींची कामे २६३ कोटींना दिल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील काँक्रिटीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळच्या लोकांना कंत्राट दिले आहे, याची चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम