ठाकरेंसह राऊतांवर नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० मे २०२३ ।  राज्यातील भाजपचे नेते ठाकरे गटावर टीका करायला एकही संधी सोडत नसल्याचे प्रत्येक वेळी दिसून येत आहे. आता भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत हि टीका केली आहे. यावेळी नितेश राणे यांनी टीका करताना संजय राऊत यांना धमकी दिली.’तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडणार’ असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडावेत अशी संजय राऊत यांची इच्छा दिसते असा उपरोधिक टोलादेखील नितेश राणे यांनी लगावला आहे.

नितेश राणे नेमके काय म्हणाले?
‘तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडणार’ असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी अलिबागमध्ये दमदाटी करून जागा घेतली. कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांनी अवघ्या काही रुपयांमध्ये घेतली असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. पत्राचाळ प्रकरणावरूनदेखील नितेश राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. मराठी माणसांची पत्राचाळमध्ये संजय राऊत यांनी घरे लाटली त्याप्रकरणात त्यांची आज कोर्टात हजेरी आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा कैदी नंबर 8959 असा उल्लेख देखील केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम