रस्त्यावर धावत होता यमदूत; शाळकरी मुले थोडक्यात बचावली

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ सप्टेंबर २०२२ । मुंबईत एका ओला कॅब चालकाने आठ जणांना जबर धडक दिल्याची घटना घडली. यात तीन ऑटोरिक्षा, एक टेम्पो व दोन दुचाकींचा समावेश आहे.

बुधवार (दि.२१) रोजी मुंबईच्या घाटकोपर येथील सुधा पार्क परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर झळकत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना बसचालक संतोष माने आठवला.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, राजू यादव असे या बेदरकारपणे कॅब चालवणाऱ्या चालकाचे नाव आहे. सुधा पार्क परिसरातून गाडी चालवत असताना अचानक राजुने गाडीचा वेग वाढवला व समोर जे दिसेल ते वाहन उडविले. एवढेच नव्हे तर त्याने शाळेत जात असलेल्या मुलांनाही लक्ष्य केले.

दरम्यान, जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांनी यादव यास ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम