माळी समाज वधु वर परिचय पुस्तिकेत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

महाराष्ट्र माळी समाज महासंघ आयोजित जळगाव येथे दि. २५ रोजी माळी समाजाचा वधू वर परिचय मेळावा राजे छत्रपती संभाजी नाट्यगृह जळगाव येथे आयोजित केला आहे.

तरी माळी समाजातील संभाव्य वधू वर यांनी आपली नावे माळी समाज वधू वर परिचय पुस्तिकेत नोंदणी करावी व दि. २० रोजी पर्यंत आपले फार्म माळी समाजातील पदाधिकाऱ्यांकडे जमा करावेत.

ज्या समाज बांधवांना माळी समाज वधु वर परिचय मेळाव्यासाठी जाहिरात द्यायची असेल त्यांनी आपली जाहिरात सुद्धा समाजातील पदाधिकाऱ्यांकडे जमा करावी .असे आवाहन भडगाव येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष शाम पाटील , माजी जिल्हाध्यक्ष दिनेश रघुनाथ पाटील , आदर्श कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश परशराम रोकडे , माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष दीपक रतन महाजन, ईश्वर साहेबराव महाजन, प्रदीप महाजन , अरुण महाजन, अनिल महाजन ,दिलीप महाजन ,शामकांत बोरसे ,राजेंद्र माळी , विश्वास महाजन, प्रकाश तायडे, पंकज पाटील ,अरुण देसले, रवींद्र सोनवणे ,अनिल पवार, शरद महाजन इत्यादी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम