भक्ती आणि कर्माच्या प्रवासात मनुष्याला मोक्ष प्राप्ती… मुक्तानंदजी भारती. रणाईचे येथे संगीतमय भागवत कथेत 13 करोड जप! कथेत हुबेहूब देखाव्याने भाविकांचे वेधले लक्ष..

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख)
कर्म हीच पुजा, कर्मापेक्षा कुणीही मोठे नाही, आपले कर्म श्रेष्ठ तर आपण श्रेष्ठ, कर्माचा देखावा न करता कर्माला भक्तीची जोड द्या! कलियुगात कर्म आणि भक्ती यांची जोड असल्यास मानवाचा हा जीवनदायी प्रवास मोक्षाकडे जातो. यामुळे मानवाला मिळालेला मानवीरूपी जीवन सफल होते.असे रणाईचे तांडा ता. अमळनेर येथे सुरु असलेल्या संगीतमय भागवत कथेत मुक्तानंदजी भारती महाराज यांनी सांगितले.
रणाइचे तांडा येथील बंजारा समाज बांधवानी येथील रुद्र नंद सरस्वती अध्यत्मिक आश्रमात 13 करोड जप भागवत महायज्ञ सुरु आहे. त्याप्रसंगी मुक्तानंदजी भारती महाराज कथा निरूपण करीत आहे. कथेला सुरुवात होण्याअगोदर संपूर्ण रणाईचे गावात मुक्तानंद महाराज यांची रथावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण बंजारा समाज बांधव, महिला, आबाल वृद्ध यांनी यात सहभाग नोंदविला. यावेळी बँडच्या वाजंत्रित मिरवणुकीत कथेला सुरुवात करण्यात आली.

भागवत कथेत सजीव देखाव्याने वेधले लक्ष ——–
संगीतमय भागवत कथा निरूपण करताना भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म, बालपण, बालपणातील लीला, गोवर्धन पर्वात,राधा कृष्ण प्रेम आणि लीला,कंसाचा संहार आदी देखावे सजीव स्वरूपात कथेत हुबेहूब सादर केल्याने यावेळी भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी रणाईचे येथील सरपंच श्री. प्रकाश चव्हाण, उपसरपंच मिश्रीलाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र राठोड, रामचंद्र चव्हाण, धारासिंग पवार, सुभाष राठोड, लक्षमण राठोड, श्रवण राठोड, गुलाब राठोड,श्रवण पवार, माजी उपसरपंच रमेश मांगू चव्हाण, धर्मदास राठोड, रसाल राठोड, झवरलाल राठोड, राजेंद्र चव्हाण, रामदास राठोड, मुलसिंग पवार, भाईदास चव्हाण, गिरीधर चव्हाण, आदी समाज बांधवाचे यावेळी सहकार्य लाभत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम