दिल्लीत पावसाचा हाहाकार ; अनेक रस्ते झाले ठप्प !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ जुलै २०२३ ।  देशात बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना दिल्ली देखील पाण्यात बुडाली आहे. दिल्लीत शनिवारी रात्री तीन तासांत 11 मिमी पाऊस झाला. आजही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. रविवारी सकाळपर्यंत यमुनेची पाणी पातळी २०६.०२ पर्यंत खाली आली होती. पावसानंतर राजधानीतील अनेक भागात पाणी साचले होते. झाडे उन्मळून पडल्याने अनेक रस्ते ठप्प झाले आहेत. पोलिसांनी अनेक मार्गांवर न जाण्याचा सल्ला दिला आहे.

एनडीआरएफने सांगितले की, गेल्या 2-3 दिवसांत दिल्ली-एनसीआरमधील पूरग्रस्त भागातून 912 जनावरांसह 6345 लोकांना वाचवण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये देशातील सर्वात महागडा बैल प्रीतमचाही समावेश आहे. त्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. उत्तर प्रदेशात गेल्या ३६ तासांत पावसामुळे झालेल्या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी 2 जणांचा बुडून तर 7 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे. शनिवारी रात्री यमुनेची पाण्याची पातळी 206.87 मीटरपर्यंत खाली आली. मात्र, हा आकडाही धोक्याच्या चिन्हापेक्षा १.५ मीटरने जास्त आहे. दिल्लीतील दोन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी काढून टाकण्यात आले असून, यंत्रे कोरडे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास आजपासून पाणीपुरवठा सुरू होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम