मोटार चोरीच्या गुन्ह्यातल्या आरोपींना 24 तासात अटक

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार | 24 जुलै |कजगाव ता भडगाव येथून जवळच आलेल्या मळगाव शिवारात मोटार चोरीची घटनाघडली होती व दिनांक २१ रोजी भडगाव पोलिसांत आयपीसीच्या कलम ३७९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्हा दाखल होऊन चोवीस तास उलटत नाही तोच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

दिनांक १७ रोजी मळगाव शिवारातील भाऊसाहेब नगराज पाटील यांच्या शेतातून जलपरी पाण्याची मोटार चोरी झाली होती व दिनांक २१ रोजी भाऊसाहेब पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली व घटनेची दखल घेऊन पोलिसांनी त्वरित तपासचक्रे फिरवली व चोवीस तासांतच आरोपींना जेरबंद केले आहे योगेश राजेंद्र पवार राहणार तांदुळवाडी रोहित पंढरीनाथ कुराळे राहणार तांदुळवाडी ह्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तसेच अन्य तीन अल्पवयीन आरोपींचा ही समावेश आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या सुचनेवरून सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे हवालदार जिजाबराव पवार पोलीस नाईक नरेंद्र विसपुते पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवळी रविंद्र पाटील राजेंद्र पाटील यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहेत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम